ईकासपुरुष बनला दारूसम्राट! संदिपान भुमरे यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करून पाच वाईन शॉप घेतले

शिवसेनेशी गद्दारी करणारे ‘ईकासपुरुष’ संदिपान भुमरे आता ‘दारूसम्राट’ बनले आहेत! मंत्रिपदाचा गैरवापर करून भुमरे यांनी सहा वाईनशॉप्सचे परवाने मिळवले आहेत. त्यापैकी तीन परवाने शिक्षक असलेल्या सुनेच्या नावावर असून, दोन पत्नीच्या नावावर आहेत. एक परवाना नातलगाच्या नावावर आहे. वाईनशॉप्ससाठी परवाने घेताना अधिपृत सरकारी चलन 1 कोटी रुपये भरावे लागते. मात्र, निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात भुमरे यांनी आपले उत्पन्न केवळ दोन कोटी रुपये दाखवल्याचा भंडापह्ड शिवसेना उपजिल्हाप्रमुख दत्ता गोर्डे यांनी केला आहे. यासंदर्भात लोकायुक्त, लोकसभा अध्यक्ष तसेच पंतप्रधानांकडेही तक्रार करण्यात आली असून, दखल न घेतल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचे गोर्डे यांनी सांगितले.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख दत्ता गोर्डे यांनी पत्रकार परिषदेत मंत्रिपदाचा गैरवापर करून संदिपान भुमरे यांनी केलेल्या गैरव्यवहाराची लक्तरेच टांगली. संदिपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे यांच्या शिक्षक असलेल्या पत्नी वर्षा यांच्या नावावर वाळूज, पुणे, जळगाव येथे वाईन शॉप्सचे तीन परवाने आहेत. तर भुमरे यांच्या पत्नी पुष्पाबाई यांच्या नावाने जालना आणि जळगावात दोन वाईन शॉप्सचे परवाने आहेत. भुमरे यांचे नातलग काकडे आणि रेवडकर यांच्या नावानेही छत्रपती संभाजीनगरातील फारोळा येथे वाईन शॉप्सचा परवाना आहे.

शिक्षक असताना सुनेच्या नावावर परवाने कसे?
संदिपान भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे यांनी 2014 मध्ये जिल्हा परिषद सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात 2013-14 चे एपूण उत्पन्न 5.72 लाख रुपये दाखवले. 2019 च्या निवडणुकीत विलास यांचे उत्पन्न दहा पटीने वाढून 49 लाखांवर गेले. विलास यांच्या पत्नी वर्षा या पाचोड येथील शिवछत्रपती प्राथमिक शाळेवर शिक्षिका आहेत. शिक्षिका असूनही त्यांच्या नावावर चक्क तीन वाईन शॉप्सचे परवाने विलास यांनी मिळवले! शिक्षिका म्हणून त्या गलेलठ्ठ पगार घेत असतानाही शपथपत्रात त्यांचे उत्पन्न शून्य दाखवले आहे.