संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरण, तेलंगणा इंडस्ट्री सीएम रेवंत रेड्डी यांची घेणार भेट

हैदराबादमधील ‘पुष्पा 2: द रूल’ च्या स्क्रिनिंगवेळी संध्या थिएटमध्ये झालेले चेंगराचेंगरी प्रकरण तेलगु सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या चांगलेच अंगाशी आले आहे. हे प्रकरण राजकीय वर्तुळातही चांगलेच लावून धरले आहे. दरम्यान सिनेनिर्माते दिल राजू यांनी अल्लू अर्जुन याच्या अटकेसंदर्भात तेलंगणा सिनेसृष्टी आज मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेणार आहेत.

तेलंगणा फिल्म विकास निगमचे अध्यक्ष राजू म्हणाले की, ते सिनेसृष्टी आणि सरकार यांच्यामध्ये दुव्याचे काम करणार आहेत. संध्या थिएटरमध्ये झालेली चेंगराचेंगरी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी भेटण्याची वेळ दिली आहे आणि संपूर्ण सिनेसृष्टी त्यांची भेट घेणार आहे. पुढे ते म्हणाले की, तेलंगणा फिल्म विकास निगम आणि सरकारमध्ये सलोखा निर्माण करण्याचे काम करणार. हैदराबादमध्ये उपस्थित प्रत्येक व्यक्ती यामध्ये सहभागी होणार.

याआधी दिल राजू म्हणाले की, संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या तेजवर व्यवस्थित उपचार सुरु आहेत. दोन दिवसांपूर्वी त्याचे व्हेंटिलेशन काढून टाकण्यात आले होते. या घटनेत तेजच्या आईचा मृत्यू झाला होता. राजू तेजच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी हैंदराबादच्या सिकंदराबादमध्ये असलेल्या किम्स रुग्णालयातही गेले. दिल राजू म्हणाले की, जखमी तेज उपचारांना प्रतिसाद देत आहे आणि त्याचे दोन दिवसांपूर्वी व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आले आहे.

अभिनेता अल्लू अर्जुन याला 4 डिसेंबर रोजी त्याचा सिनेमा प्रिमियम दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीवरुन हैदराबाद पोलिसांनी चौकशी केली होती. दरम्यान, जखमी मुलाचे वडिल भास्कर यांनी त्यांना मिळणाऱ्या समर्थनामुळे आभार व्यक्त केले आहेत.