सॅमसंगची तामीळनाडूत एक हजार कोटींची गुंतवणूक

दक्षिण कोरियाची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंग तामीळनाडूमधील श्रीपेरंबदूर येथील मॅन्युफॅक्चरिग प्लांटमध्ये एक हजार कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करणार आहे. तामीळनाडूचे उद्योगमंत्री टीआरबी राजा यांनी ही माहिती दिली. सॅमसंगच्या या नव्या गुंतवणुकीमुळे राज्यात आणखी 100 जणांना नोकऱया मिळतील. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात शेकडो कर्मचाऱयांनी वेतनवाढीसाठी आणि युनियनच्या मागणीसाठी पाच आठवडय़ांपर्यंत संप केला होता.