सॅमसंगच्या आगामी Galaxy Z Fold 7 आणि Galaxy Z Flip 7 बाबत नवीन लीक्स समोर आले आहेत. अलीकडेच या फोल्डेबल स्मार्टफोन्सची संभाव्य किंमत एका रिपोर्टमध्ये समोर आली होती, ज्यामध्ये याची किंमती आधीच्या मॉडेल्स इतकीच असू शकते, असे सांगण्यात आले होते.
लीक्समध्ये काय झाला खुलासा?
आता Galaxy Z Fold 7 आणि Flip 7 मध्ये स्टोरेज पर्याय मिळतील, अशी माहिती नवीन लीक्समध्ये समोर आली आहे. त्यासोबत Fold 7 जगभरात फक्त Qualcomm Snapdragon 8 Elite चिपसेटसह येईल, अशीही माहिती समोर आली आहे. Galaxy Z Fold7 फक्त स्नॅपड्रॅगन चिपसेट आणि तीन स्टोरेज पर्यायांसह बाजारात लॉन्च केला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार, Galaxy Z Fold7 मध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
लीक्सनुसार, कंपनी हा नवीन फोन 12GB रॅम आणि 256GB, 512GB आणि 1TB सारख्या स्टोरेज पर्यायांसह बाजारात लॉन्च करू शकते. याचा अर्थ Fold 7 ची मेमरी आणि स्टोरेज कॉन्फिगरेशन Fold 6 प्रमाणेच असेल, मात्र परफॉर्मन्सच्या बाबतीत, यात नवीन Snapdragon 8 Elite चिपसेट असेल.