
सॅमसंग लवकरच हिंदुस्थानात दोन नवीन एम-सिरीज 5G स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. या सिरीजमध्ये Galaxy M16 5G आणि Galaxy M06 5G या दोन फोनचा समावेश आहे. कंपनीने या फोन्सचा टीझर व्हिडीओ आधीच जारी केला आहे. ज्यामध्ये फोनचे काही फीचर्स उघड करण्यात आले आहेत. यातच आता अमेझॉन इंडिया वेबसाइटवर या फोनची लॉन्च तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.
Galaxy M16 5G आणि Galaxy M06 5G लॉन्च डेट
अमेझॉनच्या प्रमोशनल बॅनरनुसार, कंपनी हे दोन्ही स्मार्टफोन २७ फेब्रुवारी रोजी लॉन्च करणार आहे. सॅमसंगच्या एक्स पोस्टनुसार, Galaxy M16 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. तर Galaxy M16 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल.
मिळालेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये 8 जीबी पर्यंत रॅम दिला जाऊ शकतो. हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसरने सुसज्ज असेल. याशिवाय हा फोन अँड्रॉइड 15 आधारित वन यूआय 7 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, Samsung Galaxy M06 5G ची किंमत 10,000 ते 11,000 रुपयांच्या दरम्यान असू शकते. कारण याचे स्पेसिफिकेशन अलीकडेच लॉन्च झालेल्या Galaxy F06 5G सारखेच आहेत. तसेच Galaxy M16 5G ची किंमत थोडी जास्त असू शकते. कंपनी हा फोन 15 हजार रुपयांच्या प्रारंभिक किमतीत बाजारात आणू शकते. एकंदरीत हे दोन्ही सॅमसंग फोन बजेट फ्रेंडली असणार आहेत.