नाशिकमध्ये अजित पवार गटाला धक्का, समीर भुजबळ यांची बंडखोरी; नांदगावमधून अपक्ष लढणार

अजित पवार गटाला नाशिकमध्ये धक्का बसला आहे. छगन भुजबळ यांचे पुतणे आणि पक्षाचे मुंबईचे जिल्हाध्यक्ष समीर भुजबळ यांनी बंडखोरी केली आहे. पक्षाला राम राम करून समीर भुजबळ नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत.

समीर भुजबळ यांनी अजित पवारांना पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, भुजबळ कुटुंबीयांच्या ऋणानुबंध असलेल्या नांदगाव मध्ये परिस्थिती अतिशय बिकट आहे. गेल्या पाच वर्षात या मतदारसंघातले वातावरण अतिशय दूषित झालेले असून येथील नागरिक भयभीत आहे. नांदगाव मधील कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिकांनी आपली भेट घेऊन याबाबतली कैफियत आपल्यासमोर मांडली होती. नांदगाव मधील नागरिकांची वाढत असलेली मागणी आणि नांदगाव मधील दहशतीचे वातावरण बदलण्यासाठी या मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय मी घेतला आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मुंबई अध्यक्ष पदाचा मी राजीनामा देत आहे. तो आपण स्वीकारावा अशी नम्र विनंती
आपण आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल मी आपला ऋणी आहे.

पक्षातून राजीनामा दिल्यानंतर समीर भुजबळ नांदगावमधून विधानसभेचा अर्ज भरणार आहेत. नांदगावमधून समीर भुजबळ अपक्ष निवडणूक लढवतील असे सांगितले जात
आहे.