संतोष देशमुख यांची हत्या करणारे कोणत्या पक्षाचे आहेत? अजित पवारांनी जरा याचे आत्मचिंतन करावे. जोपर्यंत दोषींना शासन होत नाही तोपर्यंत आरोपीला सहकार्य करणाऱ्या धनंजय मुंडे यांना मंत्री करू नका, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
संभाजीराजे छत्रपती यांनी आज मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या वेळी देशमुख कुटुंबाने सर्व आपबीती कथन केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी बीडचा बिहार होत आहे, अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला. एकीकडे फुले, शाहू आणि आंबेडकरांचे नाव घेता आणि दुसरीकडे महाराष्ट्राचे वाटोळे करता. वाल्मीक कराड नावाचा गुंड मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत पह्टो काढतो. काय चाललेय महाराष्ट्रात, असा सवाल त्यांनी केला.
अशोक सोनवणे याच्यावर अन्याय होत असल्याने मध्यस्थी करण्यासाठी सरपंच संतोष देशमुख गेले होते म्हणून त्यांचे अपहरण करून हत्या होते, हे संतापजनक आहे, असे संभाजीराजे म्हणाले.