
हा जातीधर्माचा नव्हे, तर गडावरील अतिक्रमणाचा विषय होता. त्यामुळे कुणीही याला जातीधर्माचा रंग देऊ नये, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत केले.
विशाळगड किल्ल्याला मोठा इतिहास आहे. या किल्ल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे रक्षण केले आहे. अशा ऐतिहासिक किल्ल्यावर अतिशय गलिच्छ प्रकारचे अतिक्रमण झाले होते. या ठिकाणी कोंबडय़ा, बकऱया कापल्या जात होत्या. दारूच्या पाटर्य़ा होत होत्या. त्यामुळे याठिकाणचे अतिक्रमण काढावे, यासाठी मला आक्रमक भूमिका घ्यावी लागली. आता माझ्याकर जातीकादाचे आरोप़ केले जात आहेत. हे अतिक्रमण काढावे, अशी शिवभक्तांची मागणी होती. तेथील स्थानिकांनीही अतिक्रमण झाल्याचे मान्य केले होते असे संभाजीराजे म्हणाले.