मला माफ करा!!! माझ्याकडून भविष्यात अशी चूक पुन्हा होणार नाही; सायबर पोलिसांकडे स्टॅंडअप काॅमेडियन समय रैनाची कबुली

स्टॅंडअप काॅमेडियन समय रैनाला ३ वेळा समन्स बजावल्यानंतर, अखेर तो नवी मुंबई सायबर सेलमध्ये पोहोचला. या काळात पोलिसांनी त्याची ६ तास चौकशी केली. इंडियाज गॉट लेटेंट या शोमधील वादानंतर, आता समय रैनाने पहिल्यांदाच या प्रकरणात आपले म्हणणे नोंदवले आहे. त्यांच्या आधी रणवीर अलाहाबादिया आणि आशिष चंचलानी यांनी त्यांचे जबाब नोंदवले आहेत. स्टॅंडअप काॅमेडियन समय रैना गेल्या काही काळापासून त्याच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमुळे वादात सापडला आहे.

काही दिवसांपूर्वी युट्यूबर रणवीर अलाहाबादिया त्याच्या शोमध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याने पालकांबद्दल एक आक्षेपार्ह विनोद केला. यानंतर, रणवीर आणि समय यांच्यासह शोमध्ये सहभागी असलेल्यांवर देशभरातून संतापाची लाट उसळली होती. या सर्वांविरुद्ध एफआयआर देखील नोंदवण्यात आला होता. आतापर्यंत या प्रकरणात रणवीर अलाहाबादिया आणि आशिष चंचलानी यांचे जबाब घेण्यात आले आहेत. आता त्याच्या शोमध्ये, रैनाची मुंबई सायबर पोलिसांनी पूर्ण ६ तास चौकशी केली.

समय रैना काय म्हणाला?

केवळ कार्यक्रमाच्या ओघात वहावत गेल्यामुळे, आमच्याकडून अशा पद्धतीची चूक झाल्याचे यावेळी समय रैना याने कबूल केले. भविष्यात अशी चूक होणार नाही म्हणत, त्याने महाराष्ट्र सायबर सेलकडे माफी मागितली. सध्याच्या घडीला त्याची मानसिक परिस्थिती उत्तम नसल्याचेही त्याने यावेळी पोलिसांना सांगितले.

 

सर्वोच्च न्यायालयाने समयला का फटकारले होते?
सदर प्रकरणात रणवीर अलाहाबादिया याने आधीच जबाब नोंदवला होता. यानंतर त्यालाही दिलासा मिळाला. परंतु, नवी मुंबईच्या सायबर सेलने तीनदा समन्स बजावल्यानंतरही समय रैना चौकशीला गेला नाही. दरम्यान, कॅनडामधील एका कार्यक्रमादरम्यान चौकशीला न आल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने त्याला चांगलेच फटकारले होते.