![ranveer and samay raina](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/ranveer-and-samay-raina-696x447.jpg)
इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणी समय रैना, रणवीर अलाहाबादिया यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहियेत. आज इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आणि कोर्टाने तिनही युट्युबर्सची चांगलीच कानउघडणी केली. ज्या ज्या शोमध्ये समय रैना, रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वा माखिजा सहभागी होते ते शोवर सध्या बंदी घातली गेली आहे. हे शो ऑन एअर न दाखवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहबादियाला आपला पासपोर्ट ठाणे पोलीस स्थानकात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. कुठल्याही परवानगीशिवाय रणवीर अलाहबादिया परदेशात जाऊ शकणार नाही. इतकचं नाही तर महाराष्ट्र आणि आसाममध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांप्रकरणी सहकार्य करण्याचे निर्देशही कोर्टाने रणवीला दिले आहेत.
इडिंयाज गॉट लेटेंट प्रकरणी रणवीर अलाहबादियाला कोर्टाने विचारले की जी भाषा तुम्ही कार्यक्रमात वापरली त्या भाषेशी तुम्ही सहमत आहात का? अश्लीलतेचे मापदंड काय असतात? बेजबाबदारीचीसुद्धा काही मर्यादा असते. तुम्ही लोकप्रिय झालात तर तुम्ही काही करू शकत नाहीत. तुम्ही समाजाला इतकंही गांभीर्याने घेत नाही, जगात असं कोणी आहे का त्याला ही भाषा आवडेल असे कोर्टाने यावेळी म्हटले.