समायरा 18 व्या वर्षी झाली पायलट

कर्नाटकातील विजयपूर येथील अवघ्या 18 वर्षीय समायरा हुल्लूर ही तरुणी व्यावसायिक पायलट बनली आहे. कमी वयात पायलट बनण्याच्या विक्रमाला तिने गवसणी घातली आहे. समायरा ही उद्योगपती अमीन हुल्लूर यांची कन्या आहे. समायरा हिला व्यावसायिक पायलट परवाना मिळाला आहे. व्यावसायिक पायलट लायसन्स मिळवणारी ती देशातील सर्वात तरुण पायलट ठरली आहे. समायराने विनोद यादव एव्हिएशन अकादमीत सहा महिन्यांचे विमान चालवण्याचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.