
बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या गॅलक्सी अपार्टमेंटवर 14 एप्रिल 2024 रोजी गोळीबार झाला असतानाच आज पुन्हा सलमान खानला घरात घुसून मारणार अशी धमकी देण्यात आली. वरळी येथील वाहतूक विभागाच्या व्हॉट्स्अॅप ग्रुपवर सलमानसाठी धमकीचा मेसेज आला असून त्याची गाडी बॉम्बने उडवून देण्याचे त्या मेसेजमध्ये नमूद करण्यात आले आहे.
या मेसेजनंतर वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये 14 एप्रिल 2024 रोजी गोळीबार झाला. लॉरेन्स ग्रुपने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. तर पाच महिन्यांपूर्वी मुंबई वाहतूक पोलिसांना असा मेसेज आला होता. त्यावेळी दोन कोटी रुपयांची खंडणी दिली नाही तर सलमान खानचा जीव घेतला जाईल अशी धमकी देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा आज सलमानला धमकीचा मेसेज आला.