
सलमानच्या निवासस्थानाबाहेरील गोळीबारप्रकरणी पोलिसांनी सोमवारी विशेष मोक्का न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सहा अटक आरोपी तसेच तुरुंगात कैद असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईसह तीन वाँटेड आरोपींविरुद्ध हे आरोपपत्र दाखल केले. ‘गॅलॅक्सी अपार्टमेंट’बाहेर झालेल्या गोळीबारप्रकरणी क्राईम ब्रँचने 1735 पानी आरोपपत्र दाखल केले. यात भक्कम पुरावे म्हणून विविध कागदपत्रे जोडली आहेत. पुराव्यांमध्ये 46 साक्षीदारांचे जबाब तसेच फौजदारी दंड संहितेच्या कलम 164 अंतर्गत दंडाधिकाऱयांसमोर नोंदवलेल्या साक्षीदारांच्या जबाबांचा समावेश आहे.