बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. बुधवारी सकाळी मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला हा धमकीचा फोन आला आहे. यामुळे खळबळ उडाली असून सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला बुधवारी एक फोन कॉल आला. 2 कोटी रुपयांची खंडणी न दिल्यास सलमान खान याची हत्या करण्यात येईल, अशी धमकी फोन करणाऱ्याने दिली. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. ‘फ्री प्रेस जर्नल‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
अभिनेता सलमान खानला बिष्णोई गँगकडून वारंवार धमकीचे मेसेज सुरूच आहेत. मे महिन्यात सलमान खानच्या घरावरदेखील गोळीबार झाला होता. गोळीबारानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.
सलमान प्रकरणापासून दूर रहा अन्यथा ठार मारेन; बिश्नोईच्या नावाने पप्पू यादव यांना धमकी
नुकताच वाहतूक पोलिसांना व्हॉट्स अपवर एक मेसेजही आला होता. मेसेजद्वारे अभिनेता सलमान खानकडे 5 कोटी रुपयाची खंडणी मागितली गेली. जर पाच कोटी रुपयांची खंडणी न दिली गेल्यास माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यापेक्षा वाईट अवस्था होईल, असे त्या मेसेजमध्ये म्हटले होते. याप्रकरणी पोलिसांनी झारखंडमधील एका 24 वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले होते. हुसैन असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे आहे.