
ईदनिमित्त आपला आवडता भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानची एक झलक पाहण्यासाठी आज वांद्रे येथील सलमानच्या गेलेक्सी अपार्टमेंटबाहेर चाहत्यांची गर्दी उसळली होती. सायंकाळी भाईजानने घराच्या बाल्कनीत एन्ट्री घेत बुलेटप्रूफ काचेमागून चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तेव्हा चाहत्यांनीही जल्लोष करत दाद दिली. रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यासह बॉलिवूड स्टार सलमानची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गेलेक्सी अपार्टमेंटबाहेर गर्दी केली होती. संध्याकाळी पठाणी लूकमध्ये सलमान बाल्कनीत येताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला व ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या. लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
View this post on Instagram