बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला पुन्हा बिष्णोई टोळीकडून धमकी मिळाली आहे. मुंबई पोलिसांच्या ट्राफिक कंट्रोल सेलला लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने धमकीचा मेसेज मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यात म्हटले आहे की आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी आणि 5 कोटींचे दान देण्याची मागणी केली आहे. असे न केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून आमची टोळी आजही सक्रिय आहे असेही सांगण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना धमकीचा मेसेज सोमवारी मिळाला. तो मध्यरात्री ट्रॅफिक कंट्रोल रुमवर काम करणाऱ्या अधिकाऱ्याने वाचला. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार, त्य़ा मेसेजमध्ये लिहीले होते की, लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ बोलत आहे आणि जर सलमान खानला जिवंत राहायचे असेल तर त्याने आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी आणि 5 कोटींचे दान देण्याची मागणी केली आहे. असे न केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून आमची टोळी आजही सक्रिय आहे असे लिहीले आहे. पोलीस सध्या त्या धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
काही दिवसांपूर्वी सलमानला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. याप्रकरणी पोलिसांनी नोएडाच्या एका व्यक्तीला अटक केली होती. वरळी पोलिसांनी एका अज्ञाताविरोधात मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक हेल्पलाइन नंबरवर अनेक व्हॉट्सअॅप मेसेज पाठवून 2 कोटींची मागणी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.