बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घरावर काही दिवसांपूर्वी गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेनंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आता पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. सलमान खानच्या हत्येसाठी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने 25 लाखांची सुपारी जाहीर केली होती, असे पोलिसांनी सांगितले आहे.
ऑगस्ट 2023 ते एप्रिल 2024 या कालावधीत कट रचण्यात आला होता. महत्त्वाचं म्हणजे या टोळीचा पाकिस्तानाकडून एके-47, एके-92, एम-16 रायफल्स आणि तुर्की बनावटीच्या झिगाना पिस्तुलसह बंदुका मिळविण्याचा इरादा होता.
हत्येसाठी 18 वर्षांखालील मुलांना वापरण्यात आले होते. ही अल्पवयीन मुले हल्ला करण्यासाठी टोळीतील मुख्य सूत्रधाराच्या आदेशाची वाट पाहत होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.