गँगस्टरशी संबंधित गाण्याला आपले नाव दिल्यावरून लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमान खानला पुन्हा धमकी देण्यात आली आहे. मुंबईतील वाहतूक नियंत्रण कक्षात गुरुवारी फोन करून ही धमकी देण्यात आली.
महिनाभरात या गाण्याच्या गीताकाराला भयंकर सूडाचा सामना करावा लागेल असे फोनवरून म्हटले आहे. यापुढे तो गाणी लिहू शकणार नाही असे म्हणत सलमान खानमध्ये हिंमत असेल तर त्याने गीतकाराला वाचवावे असे आव्हानही दिले आहे.
दरम्यान, अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी आणि 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. रायपूरस्थित वकील फैझान खान यांच्या चोरी झालेल्या मोबाईलवरून शाहरुखला धमकीचा फोन करण्यात आला होता.