वर्ष 2024 संपायला आता फक्त एक दिवस शिल्लक राहिला आहे. यातच एकीकडे दुचाकी बाजारात अनेक बाईक्स या वर्षी लॉन्च झाल्या, तर दुसरीकडे काही बाईक्सने या वर्षात निरोप घेतला. Hero MotoCorp आणि Honda कंपनीने आपल्या काही बाईकचे मॉडेल कायमस्वरूपी बंद केले आहेत. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…
हिरो पॅशन एक्सटेक
Hero MotorCorp ने त्यांची एंट्री लेव्हल बाइक पॅशन Xtec बाईक बंद केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, किरकोळ विक्रीमुळे हिरोला ही बाईक बाजारातून काढून टाकावी लागली. या बाईकमध्ये 113.2cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिन होते, जे 9bhp पॉवर आणि 9.79Nm टॉर्क जनरेट करते. त 10 लिटरची इंधन टाकी देण्यात आली होती.
Hero Xtreme 200S 4V
Hero MotoCorp ने हिंदुस्थानात Xtreme 200S 4V बंद केली आहे. कमी विक्रीमुळे ही बाईक बंद करावी लागली. ही एक फुल फेअर स्पोर्ट्सबाईक होती. या बाईकमध्ये एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन होते, जे 18.9bhp पॉवर आणि 17.3Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले होते.
Hero XPulse 200T
या वर्षी Hero Moto Corp ने XPulse 200T बाईक बंद केली. या बाईकमध्ये 199.5cc सिंगल-सिलेंडर, एअर-ऑइल-कूल्ड, 4-व्हॉल्व्ह इंजिन आहे. हे 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले इंजिन आहे. जे 8,500rpm वर 18.9bhp पॉवर आणि 6,500rpm वर 17.35Nm टॉर्क जनरेट करते. कमी विक्रीमुळे ही बाईक बंद करण्यात आली.
होंडा एक्स-ब्लेड
या वर्षी Honda ने सप्टेंबरमध्ये X-Blade बाईक देखील बंद केली. कमी विक्रीमुळे ही बाईक बंद करण्यात आली. ही बाईक पहिल्यांदा 2018 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. यात 162cc सिंगल-सिलेंडर, PGM-Fi इंजिन देण्यात आले होते. ही एक दमदार बाईक होती, मात्र ग्राहकांना ती आवडली नाही.