गुड न्यूज… यंदा पगार 9.2 टक्क्यांनी वाढणार, 1 हजार 400 कंपन्यांच्या अहवालातून उघड

एऑन या पगारदारांचे तसेच कंपन्यांमधील परिस्थितीचे सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेने यंदा हिंदुस्थानातील नोकरदारांचा पगार 9.2 टक्क्यांनी वाढेल असे स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी याच संस्थेने हिंदुस्थानवासीयांचा पगार 9.3 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज वर्तवला होता. कंपनीने 2024-25 या वर्षाकरिता कंपन्यांमधील टर्नओव्हर तसेच विविध घटकांचा अभ्यास केला. त्यानुसार हिंदुस्थानात आर्थिक स्थिरता असेल असे निदर्शनास आल्याचे एऑन या संस्थने म्हटले आहे. या संस्थेने तब्बल 1 हजार 400 कंपन्या आणि 45 इंडस्ट्रीजचे सर्वेक्षण घेतले. तेथील नोकरदारांची स्थिती, कंपन्यांची सध्याची स्थिती यांचा आढावा घेतला. त्यानुसार नोकरदारांचा पगार यंदा 9.2 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज एऑन संस्थेने वर्तवला आहे. दरम्यान, 2022 पासून पगार घटले आहेत.