भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांमुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मियालचे उपकंत्राटदार बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेडच्या कामगारांची तीन वर्षांकरिता 5000 हजार रुपयांची पगारवाढ झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱयांनी भारतीय कामगार सेनेचे आभार व्यक्त केले आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष-खासदार अरविंद सावंत, कार्याध्यक्ष अजित साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली व संयुक्त सरचिटणीस संजय शंकर कदम यांच्या नेतृत्वाखाली ही पगारवाढ करण्यात आली. त्याचबरोबर कामगारांना इतरही लाभ मिळणार आहेत. या करारावर मियाल व्यवस्थापनाकडून व्ही. पी. (एचआर) श्रीकांत पवार, ई. आर. जी. एम. राजेश म्हात्रे, बी.व्ही.जी. व्यवस्थापनातर्फे विपिन टिकू, योगेशा राव, उत्तम उडान टूर्स आणि ट्रव्हल्सचे निशिद मष्रू यांनी सह्या केल्या. भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संतोष कदम, सूर्यकांत पाटील, राजा ठाणगे, योगेश आवळे, पोपट बेदरकर, सहचिटणीस मिलिंद तावडे, जगदीश निकम, विजय शिर्के, नीलेश ठाणगे, संजीव राऊत, बाबा शिर्के आणि बी. व्ही. जी. इंडियामधील सर्व कमिटी सदस्य व कामगार यावेळी उपस्थित होते.