सलमान-आमीर पुन्हा पडद्यावर एकत्र दिसणार

सलमान खान आणि आमीर खान ही जोडी पुन्हा एकदा मोठय़ा पडद्यावर एकत्र दिसणार आहे. सुपरहिट का@मेडी चित्रपट ‘अंदाज अपना अपना’ पुन्हा एकदा सिनेमागृहात प्रदर्शित केला जाणार आहे. हा चित्रपट 25 एप्रिल 2025 रोजी सिनेमागृहात पुन्हा प्रदर्शित केला जाणार असल्याची माहिती या चित्रपटाच्या निर्मात्यांनी केली आहे. हा चित्रपट 1994 साली प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले होते. सलमान-आमीरची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. सलमान-आमीरची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. या चित्रपटात सलमान-आमीरसह करिष्मा कपूर, रविना टंडन, शक्ती कपूर यांच्या भूमिका होत्या.