जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी जीवन संपवले

संत तुकाराम महाराजांचे वंशज, प्रसिद्ध व्याख्याते शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष महाराज मोरे (30) यांनी आज सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. या घटनेने खळबळ उडाली असून हे वृत कळताच देहू परिसरात शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. शिवव्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकीक होता. नुकतेच त्यांचे लग्न झाले होते व टिळासुध्दा झाला होता.