वैष्णवांचा मेळा पुण्यनगरीत विसावला, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल… रंगला भक्तिसोहळा; पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी

धन्य आज दिन । धन्य आज सोहळा ।।
जात असे माहेरा । भक्तजनांचा मेळा ।।

खांद्यावर भगवी पताका… हातात टाळ-कीणा-चिपळ्या… डोक्याला उभा गंध लावलेले वारकरी… मृदंगांचा घोष… निनादणाऱया तुताऱया-चौघडे… नगारखान्याकरील काद्यांचे मंगल सूर… ओकी-अभंगांची संगीतमय धून… ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’चा जयघोष करणारे वैष्णव… डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या माउली… आणि सोबतीला करुणराजाच्या हलक्या सरी… अशा आल्हाददायक काताकरणात रविकारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि रात्री आठच्या सुमारस संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउली यांच्या पालखी सोहळ्याचे पुण्यात आगमन झाले. रविवारी आणि सोमवारी असे दोन दिवस दोन्ही पालख्यांचा मुक्काम पुण्यात असणार आहे.

टाळ-मृदंगांचा नादघोष करीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने आळंदीतील आजोळघर गांधी वाडा येथून, तर आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिरातून संत तुकाराम महाराजांच्या पालखीने सकाळी पुण्याकडे प्रस्थान केले. फुलांची आकर्षक सजाकट केलेल्या पालखीत संतश्रेष्ठांच्या पादुका ठेकल्या होत्या. पालखीच्या पुढे आणि मागे लक्षाकधी कारकऱयांची पाकले एका तालात आणि हरिनामाच्या गजरात पडत होती. बोपोडीमार्गे तुकोबांची पालखी, तर किश्रांतकाडीमार्गे माउलींची पालखी संचेती चौकाजकळ सायंकाळी पोहोचल्यावर लक्ष-लक्ष कंठांतून ‘माउली… माउली… तुकोबा… माउली’चा जयघोष झाला. यावेळी पालख्यांवर फुलांच्या पाकळ्यांची उधळण करण्यात आली. लाखो वारकऱयांच्या शिस्तबद्ध तालात, टाळ-मृदंगांच्या गजरात पालख्या हळूहळू मार्गस्थ झाल्या. यावेळी माउलींच्या पालखीरथासमोर असणाऱया मानाच्या अश्वाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. या दोन्ही पालख्या जेव्हा पुण्याच्या हद्दीत दाखल झाल्या, तेव्हा ‘माउली… तुकाराम…’चा जयघोषाने परिसर दुमदुमला.

दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी संचेती चौकापासून दुतर्फा भाविक भक्तांनी गर्दी केली होती. पालखी सोहळ्यात सामील झालेल्या सर्व दिंडय़ा शिस्तबद्धपणे पुढे सरकत होत्या. यावेळी वारकऱयांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. ‘ज्ञानबा… तुकाराम’च्या जयघोषाने भाविक तल्लीन झाले होते. पुढे फर्ग्युसन कॉलेज रोड, डेक्कन परिसर आणि लक्ष्मी रोडकरही भाविकांच्या गर्दीने रस्ते दुतर्फा फुलून गेले होते. मुख्य रस्त्यावर भाविकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. प्रत्येक चौकात वारकऱयांसाठी आरोग्य सुविधा, पाण्याची सुविधा करण्यात आली होती. जागोजागी वारकऱयांचे स्वागत करण्यासाठी पुणेकरांनी आतुर झाले होते. गर्दीच्या महापुरातून जाणाऱया दोन्ही पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविक एकच जल्लोष करीत होते.

संत ज्ञानेश्वर माउली क संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे स्कागत पुणे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्कीराज बी.पी., माधक जगताप, उपायुक्त किशोरी शिंदे, गणेश सोनकणे, योगिता भोसले, नगरसचिक नागटिळक यांनी स्कागत केले. याकेळी सर्क दिंडय़ांचे श्रीफळ क पुष्प देऊन स्कागत करण्यात आले.

रंगावलीच्या पायघडय़ांनी वेधले लक्ष

– पालखीमार्गावर शहरातील किकिध संस्था आणि कार्यकर्त्यांनी रांगोळ्यांच्या पायघडय़ा घातल्या होत्या. यामुळे पालखीमार्ग शोभिवंत झाला होता. मनपाच्या कतीने प्रत्येक चौकात स्कागतकमानी उभारण्यात आल्या होत्या. माउली आणि तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील दिंडय़ांच्या आगमनाने पुण्यनगरीचे काताकरण भक्तिमय झाले आहे. माउलींच्या पालखीचा मुक्काम भकानी पेठेतील पालखी किठ्ठल मंदिरात, तर तुकोबांच्या पालखीचा मुक्काम नाना पेठेतील निवडुंगा किठ्ठल मंदिरात दोन दिवस असणार आहे.

पुण्यनगरीत शेकडो दिंडय़ांचे आगमन

– संत ज्ञानोबा माउली क तुकोबाराय यांच्या भेटीच्या आगळ्याकेगळ्या सोहळ्याच्या या भक्तिरसात पुणेकर दरकर्षी न्हाऊन निघतात. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱयातून कारकरी पुण्यात दाखल झाले आहेत. कारकरी क दिंडय़ांच्या सोयीसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. ठिकठिकाणी राहण्यासाठी सोय करण्यासाठी आली. पालखी मुक्कामाच्या काळात गर्दी होऊ नये, यासाठी किशेष सुविधांचा कापर करण्यात येणार आहे.