लक्ष असूद्या… सैनिक स्कूलसाठी आज शेवटची संधी  

सैनिक स्कूलमध्ये सहावी आणि नववी इयत्तेसाठी प्रवेश घ्यायचा असेल तर ऑनलाइन नोंदणीसाठी उद्या शेवटची तारीख आहे. ज्या पालकांना आपल्या पाल्यांसाठी सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांना 13 जानेवारी रोजी नोंदणी करावी लागेल. नॅशनल टेस्टिंग एजन्सी उद्या अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा 2025 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया बंद करणार आहे. पात्र विद्यार्थी नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे संकेतस्थळ aissee2025.ntaonline.in वर जाऊन नोंदणी करू शकतात. सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा होणार आहे. त्यासाठीची ऑनलाइन नोंदणी 13 जानेवारी रोजी बंद होईल, तर 14 जानेवारी 2025 रोजी रात्री 11 वाजून 50 मिनिटांपर्यंत शुल्क भरता येईल. 16 ते 18 जानेवारीपर्यंत अर्जातील चुका दुरुस्त करण्याची संधी देण्यात येईल.