बॉलीवूड अभिनेता सैफ अली (Saif Ali Khan Attack) खानवर चाकू हल्ला झाल्यानंतर आता मुंबई (Mumbai) पोलिसांनी त्याला संरक्षण दिलं आहे. फक्त सैफलाच नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफवार झालेल्या हल्ल्यानंतर त्याच संपूर्ण कुटुंब घाबरलं आहे. त्यामुळे पोलीस तपास होईपर्यंत त्याच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण (police protection) देण्यात आलं आहे.
असं असलं तरी सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी किती पोलिस कर्मचारी देण्यात आले आहेत, याबाबत अद्याप माहिती समजू शकली नाही. तसेच सैफ आणि त्याच्या कुटुंबाला X, Y किंवा Z यापैकी कोणत्या श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे, याची माहितीही समोर आलेली नाही.
दरम्यान, चाकू हल्ल्यानंतर सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्याच्यावर पाच दिवस उपचार सुरु होते. यानंतर 21 जानेवारीला त्याला डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून घरी परतताच सैफने स्वतःसाठी आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी सुप्रसिद्ध अभिनेता रोनित रॉयची मदत घेण्याचा निर्णय घेतला होता. रोनित रॉयची स्वतःची सुरक्षा एजन्सी आहे, ज्याचे नाव आहे एस सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन, असं आहे. सैफ अली खानने रोनित रॉयची खासगी सुरक्षा सेवा घेण्याचा निर्णय घेतला आहे.