बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर 16 जानेवारी रोजी राहत्या घरी जीवघेणा हल्ला झाला होता. हा हल्ला झाल्यानंतर सैफ तैमूरला घेऊन एका रिक्षातून लीलावती रुग्णालयात पोहोचला होता. प्रसंगावधान राखत रिक्षा चालकाने त्याला वेळेत रुग्णालयात पोहोचवले आणि माणुसकी दाखवत पैसेही मागितले नव्हते. आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफने त्या रात्री जीव वाचवणाऱ्या रिक्षा चालकची भेट घेतली होती.
भजन सिंग राणा या रिक्षा चालकाचे सैफला रुग्णालयात नेले होते. त्यामुळे त्याच्यावर वेळेवर उपचार झाले. त्यानंतर भजनसिंग याच्या अनेक मुलाखती प्रसिद्ध झाल्याने ते चर्चेत आले होते.
नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, मला माहितही नव्हते की तो एक अभिनेता आहे. मला त्यावेळी फक्त रक्तबंबाळ अवस्थेत एक माणूस दिसला आणि त्याला वेळेत रुग्णालयात पोहोचवायचे होते. त्याचा पांढरा कुर्ता संपूर्ण रक्ताने माखला होता.
बक्षीस जाहीर
दरम्यान, सैफवरील हल्ल्याप्रकरणी भजनसिंग राणा यांचा पोलिसांनी जबाबही घेतला आहे. त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधान दाखवल्यामुळे त्यांना एका संस्थेकडून 11 हजार रुपयांचे बक्षीसही देण्यात आले होते. आता सैफनेही त्यांची भेट घेतली आहे.