Saif Ali Khan Attacked – सैफवर न्युरो सर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी दोन्ही केल्या, ICU मध्ये शिफ्ट; लीलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली माहिती

अभिनेता सैफ अली खानवर लीलावती हॉस्पिटलमध्ये दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्याची प्रकृती आता स्थित असून सुधारणा होत आहे. लीलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी माध्यमांशी संवाद साधत त्याच्या प्रकृती विषयी अपडेट दिली.

सैफ अली खानला लीलावती हॉस्पिटलमध्ये रात्री 2 वाजेच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आलं. आरोपीने केलेल्या हल्ल्यात सैफच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली आहे. चाकू त्याच्या पाठीच्या कण्यात घुसला होता. शस्त्रक्रिया करून हा चाकू बाहेर कढण्यात आला. पाठीच्या कण्यातून होणारा स्त्रावही रोखण्यात आला आहे, अशी माहिती लीलावती हॉस्पिटलचे डॉक्टर नितीन डांगे यांनी दिली.

याशिवाय सैफच्या डव्या हातावर आणि मानेवरवरही गंभीर जखमा झाल्या आहेत. या जखमांवरही प्लास्टिक सर्जरी करणाऱ्या टीमकडून उपचार करण्यात आले आहेत. कार्डिओलॉजिस्ट डॉ. श्रीनिवास कुडवा यांच्या मार्गदर्शनाकाली संपूर्ण शस्त्रक्रिया पार पडली. सध्या सैफची प्रकृती स्थिर आहे. तो बरा होत असून धोक्याच्या बाहेर आहे, असे डॉ. नितीन डांगे यांनी सांगितले.

सैफ अली खान यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आली. न्यूरो सर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी दोन्ही करण्यात आल्या आहेत. ऑपरेशन थिएटरमधून आता सैफ अली खान यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. त्यांना एक दिवसासाठी डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल. त्यानंतर डिस्चार्जबाबत उद्या पुढील निर्णय घेतला जाईल. सध्या सैफची प्रकृती चांगली आहे. ते लवकरच शंभर टक्के बरे होतील, असे लीलावती हॉस्पिटलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर निरज उट्टमणी यांनी सांगितले.