गंभीर दुखापत होऊनही सैफ कसा तंदुरुस्त, बंगळुरुच्या डॉक्टरांनी दिले उत्तर

गेल्या काही दिवसांपासून सैफ अली खानला एवढी गंभीर जखम, शस्त्रक्रिया होऊनही पाच दिवसात तो एवढा तंदुरुस्त कसा अशा शंका उपस्थित केल्या होत्या. त्यावर उलट सुलट चर्चाही झाल्या.  अशातच आता बंगळुरुच्या एका डॉक्टरांनी सैफला नाव ठेवणाऱ्यांना चांगलेच उत्तर दिले आहे.

ब़ॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर 16 जानेवारी रोजी जीवघेणा हल्ला झाला आणि त्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. 5 दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर त्याला 21 जानेवारी रोजी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि तो वांद्रे येथील त्याच्या घरी विश्रांती घेत आहे. ज्या दिवशी तो रुग्णालयातून बाहेर पडला, त्याच दिवशी त्याचा एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये तो खूपच तंदुरुस्त दिसत होता. त्यामुळे अनेकांनी त्याला खरंच दुखापत झाली होती की नाही अशी शंका उपस्थित केली. अशातच  बंगळुरुचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. दीपक कृष्णमूर्ती यांनी लोकांच्या प्रश्नावर आता उत्तर दिले आहे. डॉक्टरांनी त्यांच्या सोशल मिडिया साईट एक्सवरुन आपल्या आईचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.ज्यामध्ये त्यांची आई मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर काही तासांतच फ्रॅक्चर झालेल्या पायासह चालत आहे. आईचा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिल की, ज्यांना खरोखर शंका आहे की सैफ अली खानने खरोखरच मणक्याची शस्त्रक्रिया केली आहे का त्यांच्यासाठी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिड़ीओत ते म्हणाले की, हा व्हिडीओ 2022 चा असून तो माझ्या आईचा आहे. त्यावेळी ती 78 वर्षांची होती. विशेष म्हणजे तिच्या मणक्याच्या शस्त्रक्रिये झाल्यानंतर प्लास्टर लावलेल्या फ्रॅक्चर पायासह ती चालत होती. तरुण व्यक्ती आणखी लवकर बरी होऊ शकते. सैफच्या बरे होण्यावर शंका घेणाऱ्या डॉक्टरांना मी एवढेच सांगू इच्छितो की त्याला चांगले एक्सपोजर मिळावे असे म्हटले आहे. कृष्णमूर्ती यांनी पुढे ट्विटमध्ये म्हटले की, सैफपेक्षा माझ्या आईची अवस्था बिकट होती.पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर झाले होते. सैफला फक्त सेरेब्रोस्पायनल फ्लुइड गळती झाली आणि ड्युरा मेटरमध्ये फॅक्चर होता जे बरे करण्यात आले. माझ्या आईला दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज देण्यात आला. तसेच अलिकडे बायपास शस्त्रक्रिया झाली आहे ते तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी चालणे आणि पायऱ्या चढणे सुरू करतात. त्यामुळे कोणत्याही बाबत बोलताना आधी त्या गोष्टीची माहिती करुन घेणे गरजेचे असते.