सैफ अली खान हल्ला प्रकरणात मुंबई पोलिसांना अखेर यश आले आहे. गेल्या 72 तासांपासून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी ठाण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. ठाण्यातील कासारवडवली भागातील हिरानंदानी लेबर कॅम्पमधून आरोपीला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद शरीफूल इस्लाम शहजाद (वय – 30) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी विजय दास याला वांद्र्यातील होली डे कोर्टात हजर केला जाणार आहे.
UPDATE | Saif Ali Khan attack case | Mumbai Police has confirmed that the accused was using multiple names including Vijay Das, Bijoy Das, and Mohammed Iliyas. https://t.co/0n0JQzTWDs
— ANI (@ANI) January 19, 2025
अटकेनंतर आरोपीला खार पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोप विजय दास हा एका रेस्टॉरंटमध्ये वेटरचे काम करत होता. तो मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. मुंबई पोलीस या संदर्भात सकाळी नऊच्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार आहे.