Saif Ali Khan Attack – मध्य प्रदेशातून दीपक नावाच्या तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, चौकशी करून सोडलं!

अभिनेता सैफ अली खान याच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी मध्य प्रदेशातून दीपक नावाच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. परंतु चौकशी करून त्याला सोडण्यात आले आहे.

पोलिसांनी तपासलेल्या सीसीटिव्ही नुसार सैफवर हल्ला केल्यानंतर आरोपी चालत वांद्रे स्थानकात गेला. त्यानंतर तेथून तो दादरला गेला. दादरला एका दुकानातून त्याने हेडफोन घेतले. तेथून तो पसार झाला. त्यानंतर तो कुठे गेला ते अद्याप पोलिसांना समजू शकलेले नाही. मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेची 30 हून अधिक पथके चोराला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

वांद्रे पश्चिम येथे वास्तव्यास असणाऱ्या अभिनेता सैफ अली खान याच्या घरामध्ये मध्यरात्री अडीचच्या सुमारास चोराने प्रवेश करत घरात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यावर आणि सैफ अली खानवर एकामागोमाग एक चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात त्याच्या मानेला, पाठीला गंभीर दुखपात झाली आहे. गुरुवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास त्याला लीलावती रुग्णालयात आणण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.