अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्लाप्रकरणी अटकेत असलेल्या मोहमद शरीफुल शेहजादचा मोबाईल हा अनेक गोष्टींचा उलगडा करणार आहे. पोलिसांनी शरीफुलचा मोबाईल तपासणीसाठी ताब्यात घेतला आहे. त्याच्या मोबाईलमध्ये स्क्रीन शॉट मिळून आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्या मोबाईलच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.
अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्लाप्रकरणी बांगलादेशी मोहमद शरीफुल शेहजादला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून एक मोबाईल हस्तगत केला आहे. त्या मोबाईलच्या माध्यमातून अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे. पोलिसांनी त्या मोबाईलची प्राथमिक तपासणी केली तेव्हा पोलिसांना काही स्क्रीन शॉट मिळून आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. मोहमद शरीफुलच्या मोबाईलमध्ये नेमके कोणा कोणाचे नंबर आणि त्याने ते नंबर काय नावाने सेव्ह केले आहेत, त्याने मोबाईलवर इंटरनेटचा वापर करून काय काय पाहिले होते, हेदेखील तपासले जाणार आहे.
– मोहमद शरीफुलने ई-वॉलेटचा वापर केला होता का? त्याने ई-वॉलेटसाठी कोणत्या बँक खात्याचे अकाऊंट लिंक केले होते? जर बँक अकाऊंट लिंक केले होते तर ते कोणत्या बँकेत आणि काय नावाने अकाऊंट होते हे तपासण्यात येणार आहे. मोहमद शरीफुलने ई-वॉलेटवरून कधी आणि कोणते व्यवहार झाले होते हे याचा तपास केला जाणार आहे.
– हल्ला करण्यापूर्वी त्याने कोणत्या ठिकाणी जाऊन पह्टो काढले होते का? त्याच्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये काही पह्टो आहेत का? हिंदुस्थानात आल्यावर त्याने कोणत्या नावाने सिमकार्ड आणि मोबाईल खरेदी केला होता? बांगलादेशात नातेवाईकांना संपर्प करण्यासाठी तो कोणते अॅप्स वापरत होता? त्या अॅप्सवरून त्याने कोणाला आणि कधी फोन केले होते? हे तपासण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलीस त्याचा पह्न तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवणार आहेत.