अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरण, आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीच्या पोलीस कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्यात आली आहे. वांद्रे न्यायालयाकडून आरोपी शहजादच्या पोलीस कोठडीत 29 जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

सीसीटीव्हीत दिसणाऱ्याशी फेस रेकग्निशन करणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपीचं उपरणं, कपडे जप्त केले असून बूट शोधत आहोत, असे तपास अधिकाऱ्यांनी पुढे नमूद केले.

सीसीटीव्हीत कैद झालेला आणि प्रत्यक्ष अटकेतील आरोपीत साम्य नाही, असा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी कोर्टात केला. तसेच आरोपीनेच हा गुन्हा केल्याचा कोणताही ठोस पुरावा तपास अधिकाऱ्यांनी सादर केला नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.