
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून छत्तीसगडमधील आकाश कनोजिया या तरुणाला ताब्यात घेण्यात आले होते. मात्र पोलीस तपासात आकाशचा या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचे निष्पन्न झाले आणि आकाशला सोडण्यात आले. मात्र पोलिसांच्या या चुकीची निर्दोष आकाशला मात्र मोठी किंमत मोजावी लागली. याप्रकरणी “माझा फोटो व्हायरल का करण्यात आला? मला न्याय हवा आहे,” अशी मागणी आकाशने केली आहे.
गुन्ह्यात सहभाग नसतानाही आरोपी म्हणून त्याचा फोटो मीडियात आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे आकाशला नोकरी गमवावी लागली. तसेच त्याचे ठरलेले लग्नही मोडले. यामुळे आकाशने आता न्यायाची मागणी एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत केली आहे. “माझा फोटो व्हायरल का करण्यात आला? मला न्याय हवा आहे,” अशी मागणी आकाशने केली आहे.
तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जेथे जेथे माझा फोटो शेअर केला आहे, तेथून काढून टाकण्यात यावा. अन्यथा मला न्यायालयात जावे लागेल, असा इशाराही आकाशने दिला आहे.