मांसाहारावरून साई पल्लवीचा तिखट इशारा

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी लवकरच नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’मध्ये सीतेच्या भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमासाठी साई पल्लवीने मांसाहार सोडल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत साई पल्लवीने संताप व्यक्त केला असून यापुढे अशा प्रकारच्या अफवांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा तिने दिला. साई पल्लवीने एक्सवर एक पोस्ट केली. ‘रामायण’मध्ये सीतेची भूमिका साकारण्यासाठी ती शाकाहारी झाल्याची एक बातमी होती, त्यावर साईने पोस्ट लिहून उत्तर दिले. साई पल्लवीने म्हटलंय, ‘जेव्हा मी अशा खोटय़ा, निराधार, बनावट गोष्टी पाहते तेव्हा मी बऱयाचदा, किंबहुना प्रत्येक वेळी गप्प राहते. पण, आता मात्र मी प्रतिक्रिया देण्याची वेळ आली आहे. यापुढे कोणतीही प्रतिष्ठत व्यक्ती, मीडिया किंवा कोणीही बातम्या किंवा गॉसिपच्या नावाखाली माझ्या बाबतीत अशा गोष्टी छापल्या तर मी कायदेशीर कारवाई करेन, असे ती म्हणाली.