डोळ्यांचे पारणे फेडणारा सहस्त्रकुंड धबधबा

प्रसाद नायगावकर

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाची सतत धार आहे. यामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहून आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा तर जोरदार पावसामुळे ओसंडून वाहू लागला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)


सहस्त्रकुंड धबधबा हा मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर आहे. धबधब्याच्या अलीकडचा भाग जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यात येतो तर पलीकडचा भाग नांदेड जिल्ह्यातील (मराठवाडा) किनवट या तालुक्यात येतो. हा धबधबा उमरखेड पासून 70 किलोमीटर वर तर यवतमाळपासून 181 किलोमिटर अंतरावर आहे. पावसाळ्यात हा धबधबा पर्यटकांच्या डोळयाचे पारणे फेडणारा आहे. 30 ते 40 फुटांवरून कोसळणारा धबधबा, उडणारे तुषार आणि कोसळणाऱ्या धबधब्याचा एकसुरी आवाजाने पर्यटकांना एक वेगळाच आनंद मिळतो.

मनमोहक दृश्य पाहण्याचा पर्यटकांचा आनंद काही औरच आहे. काही दिवसात वरुण देवाची लवकरच कृपा झाली. हा धबधबा पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडत आहे. असं असलं तरी पर्यटकांनी सावधानता बाळगून आपला जीव धोक्यात न टाकता या मनमोहक दृष्याचा आनंद घ्यावा अशा सूचना प्रशासनाने केल्या आहेत.