
महाराष्ट्रातील अव्वल दहा शरीरसौष्ठवपटूंच्या क्लासिक संघर्षात मुंबईच्या सागर कातुर्डेने बाजी मारली. महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेने पुण्याच्या राजगुरू नगर येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेत सागरने हरमीत सिंग, उमेश गुप्ता, पीटी अनबन, स्वप्नील नरवडकर, नीलेश रेमजे या एकापेक्षा एक दिग्गज खेळाडूंवर मात करत महाराष्ट्र क्लासिकवर आपले नाव कोरले. मुंबईचाच हरमीत सिंग उपविजेता ठरला.
विजेत्याला 41 हजारांचा तर उपविजेता 31 हजारांचा मानकरी ठरला. स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा आमदार बाबाजी काळे, हिंदुस्थानी शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस संजय मोरे, राज्य संघटनेचे सरचिटणीस अजय खानविलकर, कोषाध्यक्ष सुनील शेगडे, राजेश सावंत, दिलीप धुमाळ यांच्या उपस्थितीत पार पडला.