
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये सातत्याने सुवर्ण कामगिरी करणाऱ्या आयकरच्या सागर कातुर्डेने पी. टी. अनबन, उमेश गुप्ता, नदीम शेखसारख्या तगडय़ा शरीरयष्टिच्या खेळाडूंना मागे टाकत आम्ही दहिसरकर प्रतिष्ठानच्या ‘दहिसर श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेवर आपले नाव कोरले.
माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित या शरीरसौष्ठव स्पर्धेला मुंबई शहर आणि उपनगरातून 90 पीळदार खेळाडूंचा सहभाग लाभला. पुरूषांबरोबर महिला शरीरसौष्ठवाचेही आयोजन करण्यात आले. ज्यात रेखा शिंदेने ममता ऐझरकरवर मात करत बाजी मारली. या दमदार स्पर्धेला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांची विशेष उपस्थिती लाभली.
स्पर्धेचे भव्य आणि दिव्य आयोजन प्रयेश पाटील, सौरभ घोसाळकर आणि अजित मांजरेकर यांनी केले. या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, अमोल कीर्तिकर, उपनेत्या संजना घाडी, विभागप्रमुख उदेश पाटेकर, शुभदा शिंदे, अशोक म्हामुणकर, तेजस्वी घोसाळकर, हर्षद करकर, संजय घाडी, योगेश भोईर, अभिषेक शिर्के, धनश्री कोळगे, दीक्षा कारकर, शशिकांत झोरे, मिलिंद साटम, बाळकृष्ण ढमाले, चेतन कदम, अरुण पवार, कर्ण अमीन, अमिता सावंत, रोशनी गायकवाड, उत्तम बारबोले, सचिन मोरे, प्रवीण कुवळेकर, अक्षय राऊत, मानसी मातले, हेमा मयेकर, जितेन परमार, महक सुरती, शरीरसौष्ठव संघटनेचे अजय खानविलकर, राजेश सावंत, सुनील शेडगे, विशाल परब उपस्थित होते.
‘दहिसर श्री’ स्पर्धेचा निकाल
n 60 किलो वजनी गट ः 1.सुयश सावंत (शिवशक्ती), 2. हनुमत भगत (विपुल फिटनेस), 3. गणेश पाटील (फिजिक जिम), n 65 किलो ः 1. नदीम शेख (सावरकर), 2. संदीप शेळके (परब फिटनेस), 3. संतोष घाटाल (बॉडी वर्कशॉप), n 70 किलो ः 1. उमेश गुप्ता (यूजी फिटनेस), 2. स्वप्नील नरवडकर (नौदल), 3. उद्धेश ठाकूर (रेड रॉक्स),
n 75 किलो ः 1. अमोल जाधव (बॉडी वर्कशॉप), 2. भगवान बोराडे (परब फिटनेस), 3. गणेश उपाध्याय (परब फिटनेस), n 80 किलो ः 1. सागर कातुर्डे (आयकर), 2. संजय प्रजापती (बॉडी वर्कशॉप), 3. विशाल धावडे (बाल मित्र),
n 85 किलो ः 1. पी. टी. अनबन (नौदल), 2. नीलेश रेमजे (परब फिटनेस), 3. अभिषेक लोंढे (फिट ऍण्ड फेल्कप).
n ‘दहिसर श्री’ विजेता ः सागर कातुर्डे (आयकर)
n महिला शरीरसौष्ठव ः 1. रेखा शिंदे (बॉडी फिटनेस), 2. ममता ऐझरकर (फोकस फिटनेस), 3. राजेश्री मोहिते (केन्झ जिम).