दापोली जालगाव शिर्दे सडवली कोळबांद्रे मार्गावर गाव असलेल्या शिर्दे येथील एका नदीवरील कॉजवेवर पडलेल्या महाकाय खड्डयांमुळे या मार्गावरील एस.टी.बसच्या नियमित फेऱ्या गेल्या 20 दिवसापासून बंद पडली होती. त्यामुळे एस.टी.बसने नियमित प्रवास करणाऱ्या मार्गावरील प्रवाशांची मोठीच गैरसोय झाली होती ही बाब लक्षात घेत सडवली आणि शिर्दे येथील ग्रामस्थांनी मिळून शिर्दे नदीवरील कॉजवेवर पडलेल्या खड्डयामंध्ये स्व खर्चाने सिमेंट काँक्रीट ओतून श्रमदानाने खड्डे बुजवले. या ग्रामस्थांच्या स्तुत्य सामाजिक कामाचे दापोलीतून कौतूक होत आहे.
दापोली तालूका मुख्यालयाच्या ठिकाणाहून जालगाव, शिर्दे, सडवली, कोळबांद्रे या गावांकडे जाणारा वाहतुकीच्यादृष्टीने अतिशय महत्वाचा असा मार्ग आहे. या मार्गावर बेजेवाडीकडे जाणा-या एस.टी. बसेस सह खाजगी वाहनांची दिवस रात्र वर्दळ सुरू असते अशा या मार्गावरील शिर्दे महसुली गावाच्या हद्दीतून वाहणाऱ्या एका नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या रस्त्यावर मजवे बांधण्यात आलेला आहे. या कॉजवेवर भले मोठे महाकाय खड्डे पडले होते त्यामुळे या मार्गावरील वाहतुक ही धोक्याची झाली होती. शिर्दे ग्राम पंचायतीचे माजी सरपंच आणि सडवली गावचे सुपूत्र विकास पवार तसेच सडवली आणि शिर्दे गावातील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने संपर्क करून कॉजवेवरील खड्डे बुजवण्याची मागणी लावून धरली होती मात्र सुस्तावलेल्या ढिम्म बांधकाम प्रशासनाने येथील वाहतुक सुरळीत सुरू राहण्यासाठी लक्ष दिले ना लोकप्रतिनिधीनी लक्ष दिले त्यामुळे हा मार्ग वाहतुकीस धोक्याचा झाला होता. त्यामुळे एस.टी. बस वाहतुकीसाठी रस्ता योग्य नसल्याने कारण सांगून एस.टी. प्रशासनाने या मार्गावरील एस.टी. बसेसच्या फे-या प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी म्हणून गेल्या 20 दिवसापासून बंद ठेवल्या त्यामुळे किमान सडवली गावाच्या एस.टी बस थांब्या पर्यंत तरी या मार्गावर एस.टी. बस सुरू राहावी आणि शिर्दे सडवली गावातील प्रवाशांची प्रवासाची होणारी गैरसोय दुर व्हावी या सद्हेतूने सडवली शिर्दे येथील ग्रामस्थांनी एकत्र येवून शिर्दे नदीवरील काॅजवेवरील खड्डे हे सिमेंट काॅक्रिटने बूजवून रस्ता वाहतुक योग्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला त्यामुळे या मार्गावरील किमान कोळबांद्रे पुलापर्यंत वाहतुक आता सुरळीत राहण्यास मदत होणार आहे. तर कोळबांद्रे पुलावर पडलेल्या खड्डयामुळे मात्र कोळबांद्रे तसेच बेजेवाडीकडे जाणारी एस.टी.बस खड्डे बुजविण्याचे काम होईतोवर बंदच राहण्याची शक्यता अधिक आहे.
ज्यांची मालकी त्यांची जबाबदारी असताना सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र खड्डे बुजविण्याबाबतची काहीच हालचाल करताना दिसले नाही त्यामुळे सुरूवातीला पुराच्या पाण्यामुळे तर अलिकडे खडडयांच्या कारणांमुळे तब्बल 20 दिवस या मार्गावरील एस.टी. बस फेÚया बंद होत्या. त्यामुळे सडवली आणि शिर्दे येथील एकत्र येत पुढाकार घेवून प्रवासाच्या सोयीसाठी स्व खर्च करत आणि श्रमदान करून मार्ग सुधारण्याचे महत्वाचे काम सडवली आणि शिर्दे येथील विकास पवार, बाबु आंब्रे, प्रियांशु पवार, श्रीधर पवार, सुनिल जागडे, गणेश धामणे, विलास उजाळ, विजय कानसे, दामोदर आग्रे, दिपक आग्रे, प्रसाद खळे, अजित उजाळ, नितिन पालटे, सुरेश आग्रे, प्रतिक उजाळ, अनिल कदम, ओमकार आग्रे, मंगेश आग्रे आदी प्रमुख ग्रामस्थांसह येथील ग्रामस्थांनी केले.