रयत क्रांती संघटनेचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत हे आज एका सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत बोलत असताना त्यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आहे. त्यांच्या या वक्तव्याने सध्या सर्व स्तरातून त्यांच्यावप टीकेची झोड उठली आहे. ‘शरद पवारांना महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. नक्की कसा बदलायचा आहे. तुझ्या चेहऱ्या सारखा पाहिजे का?, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान यांचे मुखिया आदरणीय पवार साहेबांना ‘भटकती आत्मा’ म्हणाले होते. आता त्यांचे आमदार असलीच भाषा वापरत आहेत.
या आमदारांच्या वक्तव्यातून त्यांच्या पक्षाची विकृत मानसिकता दिसते.
महाराष्ट्राची राजकीय संस्कृती गेल्या दशकात बिघडवण्याचं काम अशा लोकांनी… pic.twitter.com/Z7omKhfpyE
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) November 6, 2024
जत येथे 6 नोव्हेंबर येथे महायुतीची सभा पार पडलीय या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. त्यांच्यासमोरच सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबाबत आक्षेपार्ह विधान केलं. ते म्हणाले की ”अरे पवार साहेब, तुमच्या चिल्यापिल्याने कारखाने हाणले, बँका हाणल्या, सुतगिरण्या हाणल्या, पण पवारांना मानावं लागेल, एवढं घडलं तरी सुद्धा भाषणात म्हणतं, मला महाराष्ट्र बदलायचा आहे, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला तुझा चेहरा? तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? तुला कसला चेहरा पाहिजे?