
बीसीसीआयने ‘टीम इंडिया’च्या सहायक प्रशिक्षकपदावरून अवघ्या 10 महिन्यांत काढून टाकलेल्या अभिषेक नायरने पुन्हा एकदा आयपीएलमध्ये पुनरागमन केले आहे. नायर यांना आपला जुना भिडू असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने पुन्हा आपल्या ताफ्यात घेतले आहे. केकेआरच्या संघ व्यवस्थापनाने शनिवारी ही माहिती दिली.
मुंबईचा माजी अष्टपैलू खेळाडू अभिषेक नायर गेल्या हंगामापर्यंत कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होता. तो अनेक हंगामांपासून या फ्रेंचायझीमध्ये सहायक प्रशिक्षक म्हणूनही काम करत होता. आता एका वर्षापेक्षा कमी कालावधीत नायर पुन्हा केकेआरमध्ये परतला आहे.
कोलकाता संघ यंदाच्या हंगामात संघर्ष करत असून, आतापर्यंत त्यांनी 7 पैकी केवळ 3 सामने जिंकले आहेत. संघ संकटात असताना नायरचे केकेआरच्या संघात पुनरागमन झाले आहे. 2024 मध्ये जेतेपद जिंकणाऱ्या कोलकाताच्या कोचिंग स्टाफमध्ये नायर होता. त्यानंतर संघ आयपीएल चॅम्पियन झाल्यानंतर मार्गदर्शक गौतम गंभीरला ‘टीम इंडिया’चे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले. त्यांच्यासोबत नायरलाही सहायक प्रशिक्षक म्हणून ‘टीम इंडिया’मध्ये समाविष्ट करण्यात आले. पण 10 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत त्याला संघातून वगळण्यात आले. जानेवारीमध्ये झालेल्या ‘बीसीसीआय’च्या आढावा बैठकीनंतर नायरविरुद्ध ही कारवाई करण्यात आली होती.
IPL 2025 – गुजरात टायटन्स नंबर वनच्या सिंहासनावर, दिल्ली कॅपिटल्सची पराभवामुळे दुसऱ्या स्थानी घसरण