सचिन तेंडुलकरने कुटुंबियांसह श्री क्षेत्र नृसिंहवाडीत घेतले श्री दत्त दर्शन

महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आदी राज्यातील भाविकांचे श्रदास्थान म्हणून ओळख असलेल्या श्री दत्त महाराजाची पंढरी असलेल्या कोल्हापूरातील शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दररोज हाजारो भक्त दर्शनासाठी भेट देत आसतात, येथील श्री दत्त महाराजावर क्रिकेटचे देव म्हणून ओळख असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या कुटूंबीयाची प्रचंड श्रद्धा आहे. यातच सचिन तेंडुलकर यांचे कुटुंबीयांनी आज श्री क्षेत्र नरसिंहवाडीत दाखल झाले होते. पत्नी अंजली, मुलगा अर्जुन तसेच मुलगी सारा या तिघांनी दत्त महाराजांचा चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. त्यांना पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.