
आयडियल स्पोर्ट्स अॅकॅडमीतर्फे राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने आमदार सचिन अहिर चषक शालेय कॅरम स्पर्धेत पार्ले टिळक विद्यालयाचा अमेय जंगम व सार्थक केरकर, एसव्हीएस इंग्लिश स्कूलचा समीर कांबळे, पाटकर विद्यालय-डोंबिवलीचा गौरांग मांजरेकर व शिवांश मोरे यांनी सलामीचे सामने जिंकले. परळ येथील आरएमएमएस सभागृहामध्ये डावाच्या मध्यापर्यंत 8-0 अशी आघाडी घेणाऱ्या महात्मा गांधी विद्यालय-वांद्रेची राष्ट्रीय ख्यातीची सबज्युनियर कॅरमपटू तनया दळवीला अमेय जंगमने 11-8 असे चकविले. स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक सुनील अहिर, संघाचे पदाधिकारी निवृत्ती देसाई, बजरंग चव्हाण, सुनील बोरकर, राजन लाड, शिवाजी काळे, संयोजक लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाले.