
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दैनिक ‘सामना’च्या डिजिटल आवृत्तीने घोडदौड सुरू ठेवली असून एक नवा टप्पा गाठला आहे. इन्स्टाग्रामवर सामना ऑनलाइन (@saamana_online) या अकाऊंटला वाचकांची पसंती मिळत असून इथे 100K म्हणजेच एक लाख फॉलोअर्स झाले आहेत. ‘सामना’च्या पोस्ट, स्टोरीज, रिल्स, व्हिडीओंना कोटय़वधी ह्यूज मिळत आहेत.
ब्रेकिंग न्यूज, राजकीय बातम्या यासोबतीनेच मनोरंजन, लाइफस्टाइल संदर्भातील पोस्ट आणि व्हिडीओ पाहण्यासाठी नेटकरी इन्स्टाग्रामवर ‘सामना’ला फॉलो करतात. विशेष म्हणजे 25 ते 34 वयोगटातील आणि त्याखालोखाल 35 ते 44 वयोगटातील वर्ग मोठय़ा प्रमाणात ‘सामना’ला फॉलो करत असल्याचे आकडेवारीतून समोर आहे.
जोरदार भरारी
जानेवारी महिन्यात ‘सामना’चे YouTube चॅनेलला एक लाख सबस्क्रायबर झाल्याने सिल्व्हर बटण मिळाले होते. अवघ्या दोन महिन्यांत त्यातही मोठी वाढ झाली असून लवकरच दोन लाख सबस्क्रायबरचा टप्पा चॅनेल ओलांडेल, तर फेसबुकवर 2 लाख 46 हजार इतकी फॉलोअर्सची संख्या
आहे. तर X वर ‘सामना’चे 3 लाख 56 हजार इतके फॉलोअर्स आहेत.