मोदी सत्तेवर आले ही एक दुर्घटना किंवा अपघात आहे. मोदी येण्याआधी देशाने उद्योग, विज्ञान, व्यापार, कृषी क्षेत्रात मोठी प्रगती केली. मोदी आणि त्यांच्या भगतांच्या हाती प्रगत आणि विकसित देशाची सूत्रे आली, पण मागच्या दहा वर्षांत अयोध्येतील गळके राममंदिर व ‘धो-धो’ गळणारी संसद सोडली तर नवे काय करून दाखवले? देशाला असाही काळ पाहावा लागला व आणखी किती काळ पाहावा लागेल? हे लाल किल्ल्याला पडलेले प्रश्नचिन्हच आहे. पंतप्रधानांचे भाषण कसे असू नये याचा उत्तम नमुना श्री. मोदी यांनी पुन्हा एकदा पेश केला. तोही 78 व्या स्वातंत्र्यदिनी. स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नसल्याने यापेक्षा वेगळे काय घडायचे?
स्वातंत्र्याच्या बाबतीत पंतप्रधान मोदी व त्यांचे लोक कधीच गंभीर नव्हते. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी केलेले भाषण हे ‘पकाव’ होते. निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलावे असे थिल्लर भाषण त्यांनी केले. पंतप्रधान काय म्हणतात? कधीकाळी आतंकवादी आपल्या देशात घुसून आम्हाला मारून जात होते. आता सेना सर्जिकल स्ट्राईक करते, एअर स्ट्राईक करते. त्यामुळे देशातील नौजवानांची छाती गर्वाने फुगते, अशी थाप लाल किल्ल्यावरून मारण्यात आली. पंतप्रधानांचे संपूर्ण भाषण हे थातूरमातूर स्वरूपाचेच आहे. पंतप्रधानांनी सैन्याचा गौरव केला हे योग्यच आहे. सीमेवर सेनेचे पहारे आहेत म्हणून मोदी त्यांच्या सरकारी घरात व लाल किल्ल्यावर सुरक्षित आहेत. पूर्वी दुश्मन आपल्या देशात घुसून आम्हाला मारत होते असे आता पंतप्रधान म्हणतात. हा आपल्या सैन्याचा व सुरक्षा बलाचा अपमान आहे. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना देशात ‘कारगील’ युद्ध झाले व तेव्हा पाकिस्तानच्या फौजा आत घुसल्या व आपल्याच जमिनीवर भारताचे असंख्य सैनिक तेव्हा हुतात्मा झाले. मोदी यांनी कारगील घुसखोरीचा व त्यानंतरच्या युद्धाचा संदर्भ द्यायला हवा होता. पाकिस्तानबरोबर दोन युद्धे झाली व त्या दोन्ही युद्धांत भारतीय सैन्याने पाकिस्तानला धूळ चारली. 1971 च्या युद्धात बलदंड इंदिरा गांधी यांनी युद्ध पुकारून पाकिस्तानचे
सरळ दोन तुकडे
केले. त्यातील एक तुकडा म्हणजे आजचा बांगलादेश. त्या बांगलादेशच्या पंतप्रधान आता आपल्या देशात घुसल्या आहेत व मोदी यांनी शेख हसीना यांना राजाश्रय दिला आहे. 1947 च्या फाळणीचा बदला इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानची फाळणी घडवून घेतला व त्यामुळे फाळणीत बळी पडलेल्या असंख्य अभागी जिवांच्या आत्म्यास मोक्ष मिळाला. इंदिरा गांधींप्रमाणे असे एखादे भरीव काम श्रीमान मोदी किंवा शहा यांनी केले असेल तर समोर आणावे. इंदिरा गांधी यांनी खलिस्तानी अतिरेक्यांची पर्वा न करता अमृतसरमध्ये रणगाडे घुसवले व शेवटी देशासाठी स्वतःच बलिदान दिले. मणिपुरात हिंसाचाराचा उद्रेक तीन वर्षे चालला आहे व मोदी यांनी मणिपुरातील ‘म’देखील तोंडातून उच्चारलेला नाही. त्यामुळे देशाने पूर्वी जसा पंडित नेहरू, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्रीचा खणखणीत काळ पाहिला तसा आता देशाने मोदींचा काळही पाहिला. चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केली व त्याचे खापर मोदी पंडित नेहरूंवर पह्डत असतात. मोदींच्या काळात चीनने लडाखपर्यंत घुसखोरी केली. अनेक गावांत व हिमालयात रस्ते, पूल, हेलिपॅड बांधले. आमच्या जवानांवर आमच्याच हद्दीत घुसून हल्ले केले. हा अत्यंत वाईट काळ गेल्या दहा वर्षांत जनतेने अनुभवला आहे. मोदी यांनी लाल किल्ल्यावरून असाही दावा केला की, ‘या देशाने असाही काळ पाहिलाय जेव्हा ‘होईल’, ‘केले जाईल’, ‘हे तर चालेलच, आपण कशाला कष्ट करायचे?’ ‘पुढची पिढी पाहून घेईल.’ ‘आपल्याला संधी मिळाली आहे, मजा करून घ्या. पुढचा येईल तो बघून घेईल.’ मात्र आम्ही या मानसिकतेला छेद दिला
अशी वल्गना
पंतप्रधानांनी केली. देश स्वतंत्र झाल्यावर हा देश कष्टातून व श्रमिकांच्या घामातून उभा राहिला. ब्रिटिश देश लुटून गेले व ब्रिटिशांचे सामान बांधण्याचे व बोजा उचलून बोटीत ठेवण्याचे काम जे लोक करीत होते, त्यांची पुढची पिढी आज दिल्लीत व राज्याराज्यांत सत्तेवर आहे. मोदी सत्तेवर आले ही एक दुर्घटना पिंवा अपघात आहे. मोदी येण्याआधी देशाने उद्योग, विज्ञान, व्यापार, कृषी क्षेत्रात मोठी प्रगती केली. मंदिर-मशिदींच्या वादात न पडता अणुभट्टय़ा, ऊर्जा, शिक्षण, आयआयटीसारख्या संस्थांची उभारणी नेहरू यांनी केली. मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेचे आकाश मोकळे केले व जगाने हिंदुस्थानात पावले टाकली. मोदी आणि त्यांच्या भगतांच्या हाती प्रगत आणि विकसित देशाची सूत्रे आली, पण मागच्या दहा वर्षांत अयोध्येतील गळके राममंदिर व ‘धो-धो’ गळणारी संसद सोडली तर नवे काय करून दाखवले? भारतीय राज्यघटनेची मोडतोड, न्यायालयांवर, केंद्रीय यंत्रणांवर दबाव टाकून लोकशाही व विरोधी पक्षांचा गळा घोटण्याचे काम या काळात झाले. देशाला असाही काळ पाहावा लागला व आणखी किती काळ पाहावा लागेल? हे लाल किल्ल्याला पडलेले प्रश्नचिन्हच आहे. पंतप्रधानांचे भाषण कसे असू नये याचा उत्तम नमुना श्री. मोदी यांनी पुन्हा एकदा पेश केला. तोही 78 व्या स्वातंत्र्यदिनी. स्वातंत्र्य लढय़ाशी संबंध नसल्याने यापेक्षा वेगळे काय घडायचे?