मोदी राज्यात भारतातीलच नव्हे तर जगभरातील हिंदू खतऱ्यात आला. देशात हिंदू-मुसलमानांत भांडणे लावायची व त्याच भीतीच्या वातावरणात निवडणुका जिंकायच्या हा मोदी सरकारचा देशी खेळ असला तरी देशाबाहेरच्या हिंदूंवर हा खेळ उलटताना दिसतो आहे. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार हे त्याचे उदाहरण. बांगलादेशातील हिंदूंसाठी भारतातील संसद दोन अश्रू ढाळायला तयार नाही. संसदेत हिंदूंवरील अत्याचारावर बोलू दिले जात नाही. कोण्या एका जॉर्ज सोरोसवर भाजपचे लोक संसद बंद पाडतात. बांगलादेशातील हिंदूंसाठी मात्र अयोध्येतील राममंदिराच्या घंटा वाजवून जागरण करायलाही कोणी तयार नाही. देशातील हिंदू समाज भाजपने मुर्दाड केलाय. हा मुर्दाड हिंदू हेच भाजपचे आणि मोदींचे बलस्थान आहे!
भारतीय जनता पक्ष आणि मोदी सरकारचे हिंदू प्रेम हे ढोंग आहे. तसे नसते तर बांगलादेशात हिंदू समाजावर जे अत्याचार सुरू आहेत त्यावर संसदेत चर्चा होऊ दिली असती आणि पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेशात घुसून त्या सैतानांना धडा शिकविण्याची आरोळी ठोकली असती, पण यापैकी काहीच घडलेले नाही. ‘जॉर्ज सोरोसची अमेरिकेतील संस्था म्हणजे, विदेशी हात भारतात काँग्रेसला मदत करत असून सोरोसच्या इशाऱ्यावर संसदेचे काम बंद पाडले जात आहे,’ असा आरोप करून भाजपने सोमवारी संसदेचे काम बंद पाडले, पण बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांवर चर्चा होऊ द्या ही शिवसेनेची मागणी मान्य केली नाही. बांगलादेशातील हिंदू मारले जात असताना त्यांना तो जॉर्ज सोरोस महत्त्वाचा वाटतो यास काय म्हणावे? बांगलादेशातील हिंदूंना आज कोणीच वाली राहिलेला नाही. शेख हसिना यांची सत्ता उलथवून लावल्यावर तेथील कट्टरपंथीयांनी हिंदू समाजाला लक्ष्य केले. हिंदूंची घरे, व्यवसाय, शैक्षणिक संस्था, मंदिरे यांवर हल्ले सुरू आहेत. हिंदू मंदिरांच्या पुजाऱ्यांना अटका झाल्या. हिंदूंचे खून पडत आहेत, पण भाजपचे शंकराचार्य श्रीमान मोदीजी व त्यांचे चेले यावर तोंड शिवून बसले आहेत. अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरनिर्मिती, ओरिसातील विजयानंतर ‘जय जगन्नाथ’चा नारा द्यायचा, समान नागरी कायदा आणि वक्फ बोर्डाच्या कायद्यात सुधारणा करण्याची घोषणा करायची, हिंदूंनी तीन-चार मुलांना जन्म देऊन लोकसंख्या वाढविण्याचे सल्ले द्यायचे, ‘बटेंगे तो कटेंगे,’ असे बोंबलून
हिंदूंच्या मनात भीती
निर्माण करायची आणि निवडणुका जिंकायच्या एवढ्यापुरतेच भाजपचे हिंदुत्व मर्यादित आहे. मशिदींखाली मंदिरे असल्याचे सांगून वातावरण तापवल्याने यांचे हिंदुत्व जागे होते, पण बांगलादेशात रोज हिंदू मारला जातोय, ते सर्व प्रकार यांना अस्वस्थ करीत नाहीत. बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या हल्ल्यांचा निषेध म्हणून अनेक राज्यांत निषेध, आंदोलने झाली. उत्तर प्रदेश, हरियाणा, प. बंगाल, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश अशा राज्यांत हिंदू संघटनांनी आंदोलने केली. महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रस्त्यावर उतरून बांगलादेशातील हिंदूंचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत राहिली. कोलकात्यातील आंदोलनात ढाक्याच्या जामदानी साड्यांची होळी करण्यात आली, पण या सगळ्यात भाजप व त्यांच्या इतर संघटना कोठेच दिसत नाहीत. ज्या हिंदू संघटना बांगलादेशातील हिंदूंचा आवाज बनून आंदोलनात उतरल्या आहेत, त्यात भाजप कोठेच नाही. याचा अर्थ इतकाच की, बांगलादेशात भाजपला निवडणुका लढवायच्या नसल्याने तेथील हिंदू मेला काय किंवा जगला काय, काहीच फरक पडत नाही. बांगलादेशातील हिंदूंपेक्षा त्यांना संभल, अजमेर शरीफ दर्ग्याखाली खोदकाम करून धार्मिक तणाव वाढविणे हे महत्त्वाचे वाटते. बांगलादेशातील हिंदू हा आज अत्यंत हतबल व असहाय्य स्थितीत जगतो आहे. तेथील हिंदूंनी पलायन सुरू केले, पण भारतीय सीमेवर त्या अत्याचारग्रस्त हिंदूंची नाकाबंदी करण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षांत त्या सीमा पार करून हजारो रोहिंगे, बांगलादेशी घुसले, पण
भयग्रस्त हिंदू समाजाला
मात्र अडवले गेले. येथे त्यांचे ते आंतरराष्ट्रीय नियम, कायदे, धोरणे आडवी येतात. पाकिस्तानच्या बालाकोटवर हल्ला करून छाती फुगवून चालणारे मोदी सरकार ते हेच का? मग बदला घेण्यासाठी जी कारवाई पाकिस्तानवर केली ती कारवाई बांगलादेशच्या बाबतीत का करू नये? मोदी-शहांचे मजबूत हिंदुत्ववादी सरकार असताना बाजूच्या बांगलादेशात हिंदू मार खात आहेत. यास काय नेहरू, इंदिरा गांधी, ममता बॅनर्जी जबाबदार आहेत की श्रीमान राहुल गांधी? महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले म्हणून पराभव झाला असे बरळणाऱ्यांनी बांगलादेशातील हिंदूंच्या बाबतीत तुम्ही नेमके काय सोडले, याचा खुलासा केला तर बरे होईल. भाजपचे हिंदुत्व हा एक राजकीय व्यवहार आहे, स्वार्थ आहे, ढोंग आहे. मोदी राज्यात भारतातीलच नव्हे तर जगभरातील हिंदू खतऱ्यात आला. पंतप्रधान मोदींची धोरणे जगभरातील हिंदूंना असुरक्षित करणारी आहेत. देशात हिंदू-मुसलमानांत भांडणे लावायची व त्याच भीतीच्या वातावरणात निवडणुका जिंकायच्या हा मोदी सरकारचा देशी खेळ असला तरी देशाबाहेरच्या हिंदूंवर हा खेळ उलटताना दिसतो आहे. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार हे त्याचे उदाहरण. बांगलादेशातील हिंदूंसाठी भारतातील संसद दोन अश्रू ढाळायला तयार नाही. संसदेत हिंदूंवरील अत्याचारावर बोलू दिले जात नाही. कोण्या एका जॉर्ज सोरोसवर भाजपचे लोक संसद बंद पाडतात. बांगलादेशातील हिंदूंसाठी मात्र अयोध्येतील राममंदिराच्या घंटा वाजवून जागरण करायलाही कोणी तयार नाही. देशातील हिंदू समाज भाजपने मुर्दाड केलाय. हा मुर्दाड हिंदू हेच भाजपचे आणि मोदींचे बलस्थान आहे!