![Matthew Breetzke](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Matthew-Breetzke-696x447.jpg)
दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तिरंगी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या नवख्या फलंदाजाचे वादळ गोंगावले. 10 जानेवारी रोजी पार पडलेल्या दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या सामन्यात सलामीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या ब्रीट्झकेने धुवाँधार फलंदाजी करत इतिहास रचला आहे.
पाकिस्तानातील गद्दाफी स्टेडियमवर उभय संघांमध्ये सामना पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या ब्रीट्केझकेने पदार्पण केले. त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार केला आहे. त्याने सलामीला येत 148 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि 5 खणखणीत षटकारांच्या मदतीने 150 धावांची वादळी खेळी केली आहे. या खेळीसोबतच त्याने वनडेमध्ये पदार्पणात सर्वाधिक धावा करण्याचा वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडू डेसमंड हेन्सचा विक्रम मोडला आहे. डेसमंड हेन्स यांनी 1978 मध्ये वनडेमध्ये आपल्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियावरुद्ध 148 धावा केल्या होत्या. त्यानंतर कोणत्याच फलंदाजाला हा विक्रम मोडता आला नाही. परंतु आता दक्षिण आफ्रिकेच्या मॅथ्यू ब्रीट्झकेने हा विक्रम मोडला असून इतिहास रचला आहे.