परदेशी पाहुण्यांसोबत फोटो काढायचा आनंद अनेकजण घेतात. अनेक परदेशी लोक हसत हसत फोटो काढायला देतात. मात्र कधी कधी फोटोंचा अतिरेक होतो आणि मग परदेशी पाहुणेही कंटाळतात. यावर हिंदुस्थानात आलेल्या एका रशियन तरुणीने नामी शक्कल लढवली आहे. या रशियन महिलेने प्रत्येक हिंदुस्थानीकडून तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी 100 रुपये शुल्क आकारायला सुरुवात केलेय. अँजेलिना असे तिचे नाव आहे. ती हातात एक कागद घेऊनच फिरते. ‘एक सेल्फी 100 रुपये’ असे त्या कागदावर लिहिलेले आहे. पर्यटनस्थळी फिरताना कुणी सेल्फी किंवा फोटो काढायला आले की ती हसून तो कागद दाखवते. लोकही तिला शंभर रुपये देऊन फोटो काढून घ्यायला तयार असतात. याचा व्हिडीओ शेअर करताना अँजेलिनाने लिहिलंय, ‘अशा तऱ्हेने आम्ही खूश आहोत.