रशियाकडून लढताना 12 हिंदुस्थानींचा मृत्यू,16 बेपत्ता; परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती

रशियन सैन्यात सेवा देणाऱया 12 हिंदुस्थानींचा युक्रेनसोबतच्या युद्धादरम्यान मृत्यू झाला असून 16 जण बेपत्ता असल्याची यादी रशियाने दिली आहे, अशी माहिती आज परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवत्ते रणधीर जैस्वाल यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. रशियन सैन्यासाठी एकूण 126 हिंदुस्थानी काम करत होते. त्यापैकी 96 जणांना सैन्यातून सोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

16 हिंदुस्थानी नागरिकांची अद्याप कुठल्याही प्रकारची माहिती हाती आलेली नाही. त्यामुळे त्यांना बेपत्ता घोषित करण्यात आल्याचे रशियन सरकारने स्पष्ट केले आहे. या नागरिकांची माहिती मिळवण्याच्या दृष्टीने आम्ही सातत्याने रशियन सरकारच्या संपका&त आहोत. बेपत्ता नागरिकांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत, असे जैस्वाल यांनी सांगितले.  या आठवडय़ात केरळच्या एका हिंदुस्थानी नागरिकाचा रशिया आणि युव्रेन युद्धात मृत्यू झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवत्ते रणधीर जैस्वाल यांनी सांगितले. बिनील टीबी असे या नागरिकाचे नाव असून तो त्रिसुरचा रहिवाशी आहे. त्याचा मृत्यू दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. त्याचा मृतदेह हिंदुस्थानात आणण्यासाठी आम्ही मॉस्को येथील हिंदुस्थानी दूतावासाच्या संपका&त आहोत, असे ते म्हणाले. दरम्यान, केरळमधील आणखी एक नागरिक युद्धात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मॉस्को येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.