रशियाचा युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला, 13 नागरिक ठार

रशियाने आज रात्री उशिरा दक्षिण युक्रेनमध्ये केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 13 नागरिक ठार झाले. दक्षिण युक्रेनमधील झापोरिझ्झिया शहरात रशियाने हल्ला केला, ज्यात डझनभर लोक जखमी झाले असल्याची माहिती एका स्थानिक अधिकाऱयाने दिली. युव्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्या टेलिग्राम चॅनेलवर पोस्ट केलेल्या छायाचित्रांमध्ये शहरातील रस्त्यांवर लोक पडलेले दिसत आहेत. हल्ल्यानंतर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून जखमींवर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात किमान 13 जण दगावले असल्याचे वृत्त आहे. विशेष बाब म्हणजे, हल्ल्याच्या काही मिनिटांपूर्वी झापोरिझ्झिया शहराच्या परिसरात हाय-स्पीड क्षेपणास्त्र आणि ग्लाइड बॉम्ब डागण्याचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला होता.